पद्म पुरस्कारःनामांकन-शिफारशींसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध


अकोला, दि.३०(जिमाका)- भारत सरकारतर्फे विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी आता ऑनलाईन पद्धतीने नामांकन व शिफारशी स्विकारण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने संकेतस्थळावर दुवे उपलब्ध करुन दिले आहेत. पद्म पुरस्कार-२०२४ साठी ऑनलाईन नामांकन शिफारशी स्विकारण्यास दि.१ मे २०२३ पासून सुरुवात झाली असून नामांकने स्विकारण्याची अंतिम तारीख १५सप्टेंबर २०२३ आहे.

कला, साहित्य,शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रात विशिष्ट आणि अद्वितीय कामगिरी-सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. वंश व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र मानल्या जातात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्व सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र मानले जात नाहीत.

या पुरस्कारांसाठी सर्व नागरिकांना नामांकन, शिफारशी पाठवण्याचे आवाहन केले जात आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती अशा कोणत्याही निःस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींची शिफारस केली जाऊ शकते. नामांकन/ शिफारशीमध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात दिलेले सर्व तपशील द्यावेत. शिफारस केलेल्या व्यक्तीची संबंधित क्षेत्रातील कामगिरी/ सेवा वर्णनात्मक स्वरूपात जास्तीत जास्त ८०० शब्दात द्यावी. अधिक तपशील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर https://mha.gov.in  पुरस्कार आणि पदके' या शीर्षकाखाली आणि पद्म पुरस्कार https://padmaawards.gov.in देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम  https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पद्म पुरस्कार नामांकन/ शिफारशीत आपले योगदान द्यावे,असे आवाहन करण्यात  आले आहे.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ