प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ;दि.३१ जुलै २०२३ अंतिम मुदत

 


    अकोला, दि.३०(जिमाका)- जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६  cup & cap model (८०:११०) नुसार राबविण्याबाबत दि.२६ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार सूचना प्राप्त आहेत. या योजने अंतर्गत सोयाबीन, मूग,उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. अंतिम दिनांकापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

               अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंमलबजावणी करिता एचडीएफसी इर्गो जनरल इन्सुरन्स कं.लि., मुंबई या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.

संपर्क-एचडीएफसी इर्गो जनरल इन्सुरन्स कं.लि. डी- ३०१, तिसरा मजला, ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रिक्ट (मॅग्नेट मॉल) लाल बहादुर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई-४०००७८. टोल फ्री क्र : १८००२६६०७००.

ई-मेल: pmfby.maharashtra@hdfcergo.com

 

अधिसूचित पिके- खरीप ज्वारी, कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन. जिल्ह्यातील सर्व तालुके व सर्व महसूल मंडळांसाठी ही योजना लागू आहे.

मिळणारे संरक्षणः प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इ.बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे काढणी पश्च्यात नुकसान या बाबींचा समावेश आहे. जोखीमस्तर ७० टक्के असा आहे.

कोणाला होता येईल सहभागी-

सन २०२३-२४ पासून शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  ऐच्छीक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवयाचा नसेल तर त्यांनी सहभागी न होणे बाबतचे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर संबंधित बँकेस देणे आवश्यक आहे. योजनेत सहभाग नोंदविणेकरिता नजीकचे CSC केंद्र अथवा बँकेतून विमा काढता येईल.

पीक विमा संरक्षण मिळविण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत दि.३१ जुलै २०२पूर्वी जास्तीत जास्त संख्येने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

  अधिक माहितीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ