मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम: राजकीय पक्षांची सभा सोमवारी (दि.१९)

 अकोला, दि.१६(जिमाका)- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि.१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर  आधारीत अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात मतदार यादी अद्यावतीकरणाची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांची सभा सोमवार दि.१९ रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस उपस्थितीचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा