मुर्तिजापूर येथे आज (दि.२०) ‘शासन आपल्या दारी’ महाशिबीर
अकोला, दि.१९(जिमाका)- शासकीय योजना अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या
दृष्टीने राज्यशासनाने ‘शासन आपल्या दारी’, हे अभियान सुरु आहे. याअंतर्गत मंगळवार
दि.२० रोजी मुर्तिजापूर येथे ‘शासन आपल्या दारी’ हे महाशिबीर आयोजित करण्यात आले
आहे. मंगळवार दि.२० रोजी सकाळी १० वाजता आ. हरिष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली हे महाशिबीर
होणार असून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचीही यावेळी उपस्थित असेल. राधामंगलम हॉल, तिडके नगर,मुर्तिजापूर येथे हे
महाशिबीर होणार आहे. या अभियानात शासनाच्या विविध योजनांची माहिती व पात्र
लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील नागरिकांनी या
अभियानाचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसिलदार शिल्पा बोबडे यांनी केले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा