कापशी रोड येथील महिला बचत भवनाचे विभागीय आयुक्ताचा हस्ते भूमिपूजन; उत्पादित वस्तू विक्रीसाठी महिलांना मिळणार हक्काचे व्यासपीठ - विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे





 

अकोला, दि. 10(जिमाका)- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व आर. आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार निधी यांच्या अभिसरणातून अकोला तालुक्यातील कापशी रोड येथे जिल्ह्यातील पहिले महिला बचत भवन उभारले जाणार आहे. या बचत भवनाचे भुमिपूजन आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांच्या हस्ते झाले. बचत भवनाच्या निर्मितीमुळे महिलांच्या उत्पादित वस्तू विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे, असे प्रतिपादन केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी, कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण, जल जीवन मिशन प्रकल्पाचे संचालक मदन सिंह बहुरे आदींची उपस्थिती होती.

विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी महिला बचत गटांच्या महिलांची संवाद साधत त्यांच्या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील एकमेव गोबरधन प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे गॅस व वीज निर्मिती होणार असून आजूबाजूच्या परिसरातील गोधन व शेती उत्पादनातील टाकाऊ घटकांचा वापर या प्रकल्पासाठी होणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प ठरणार असल्याची माहिती यावेळी दिली.

कापशी रोड येथील शाळेच्या भिंतीवर बाल सुलभ चित्रांची रंगरंगोटीची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजना बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व जिल्हा परिषद यंत्रणेचे कौतुक केले. त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत जल शुद्धीकरण प्रकल्पालाही भेट दिल्या. यावेळी ग्रामपंचायतचे प्रशासक सतीश सरोदे, माजी सरपंच अंबादास उमाळे, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी व  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील राहुल गोडले, सागर टाकले आदी उपस्थित होते.

00000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ