गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना; इच्छुक गोशाळांकडून अर्ज मागविले

 अकोला, दि.१६(जिमाका)- पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २०२३-२४ आर्थिक वर्षापासून सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अकोला जिल्ह्यातील अकोला तालुका वगळता सर्व तालुक्यात  राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गोशाळांची निवड करावयाची आहे. त्यातील पात्र गोशाळांना  शासनाचे अनुदान मिळणार आहे. तरी पात्र संस्थांनी पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे आपले अर्ज सादर करावे. अर्ज दि.१९ जून ते दि.१९ जुलै या कालावधीत सादर करता येतील, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ