जवाहर नवोदय विद्यालयात जी २० कार्यशाळा

 अकोला, दि.१६(जिमाका)- येथील जवाहर नवोदय विद्यालय, बाभुळगाव येथे गुरुवारी (दि.१५) एनईपी जी-२० कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सरपंच बाभुळगाव सुशिल सिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मिलिंद बनसोडे यांनी केले. प्राचार्य आर.एस. चंदनशीव यांनी मार्गदर्शन केले. ज्युबिली इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य रमा मान्कर यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अतुल दाभाडे यांनी तर आभार प्रदर्शन  उपप्राचार्य कविता चव्हाण यांनी केले. कार्यशाळेत जवाहर नवोदय विद्यालय व ज्युबिली इंग्लिश स्कूल च्या शिक्षकांनी सहभाग घेतला.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ