अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती


अकोला,दि.२६(जिमाका)- राज्यातील अनुसुचित जमातीच्या 10 विद्यार्थांना  परदेशात  पदवी / पदव्युत्तर  अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे त्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या  दिनांक 31 मार्च 2005 व 16 मार्च 2016 च्या शासन निर्णयानुसार विहित नमून्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला या कार्यालयात उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी  शुक्रवार दि.30 जूनपर्यंत विहित नमून्यातील अर्ज  परिपूर्ण भरून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला  येथे सादर करावे.अर्ज करण्याकरीता आवश्यक असलेली पात्रता अटी व शर्ती  ही याच कार्यालयाच्या सुचना फलकावर उपलब्ध आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांनी केले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ