डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना; 30 जूनपर्यंत मदरशांकडून प्रस्ताव मागविले


            अकोला, दि. 23(जिमाका)-  डॉ. झाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या पात्र मदरशांकडून परिपूर्ण प्रस्ताव 30 जूनपर्यंत मागविले आहे. जिल्ह्यातील अनुदानासाठी इच्छूक पात्र मदरशांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे यांनी केले आहे.

अटीशर्ती याप्रमाणे : मदरशा चालविणारे संस्था धर्मादाय आयुक्त किंवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावे. शासननिर्णय दि. 11 ऑक्टोंबर 2013 च्या तरतुदीनुसार विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पसंख्यांक शाखा येथे दोन प्रतीत कार्यालयीन वेळेत सादर करावा. शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त तीन डी. एड. किंवा बी. एड. शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, मराठी, इंग्रजी, व उर्दु यापैकी एका माध्यमाची निवड करुन त्यानुसार शिक्षकांची नेमणुक करणे आवश्यक राहिल.  ग्रंथालय व शैक्षणीक साहित्यांसाठी फक्त पहिल्यांदा रु. 50 हजार रुपये व तद्नंतर प्रती वर्षी 5 हजार रुपये अनुदान देय राहिल. पायाभुत सुविधांसाठी 2 लाख रुपये अनुदान देय राहिल. यापुर्वी ज्या प्रयोजनाकरीता अनुदान देण्यात आले आहे त्या प्रयोजनाकरीता पुन्हा अनुदान देय असणार नाही. ज्या मदरशांना स्किम फॉर प्रोव्हाईडींग क्लालिटी एज्यूकेशन इन मदरसा या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरशांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.तसेच विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ