'वैश्विक पर्यावरण' विषयावर अरविंद पोहरकर यांचे व्याख्यान


           


अकोला,दि.6 (जिमाका)-  विश्व पर्यावरण दिन व ‘जी 20 जनभागीदारी अभियान’ अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे शनिवारी (दि.3) व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी वैश्विक पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन केले.  

            वैश्विक पर्यावरण हे प्रत्येक व्यक्तीशी कसे निगडित आहे आणि पृथ्वीवर जगणाऱ्या सर्व जीव जंतूंचा जगण्याचा अधिकार मानवा इतकाच त्यांनाही आहे याची जाणीव अरविंद पोहरकर यांनी आपल्या व्याख्यानातून करून दिली. भारतीय लोक परंपरा आणि जीवन पद्धती ही निसर्गाशी जुळलेली असून परंपरेने निसर्ग पूजक राहिलेले आहे. त्यानुसार आमचे सगळे सण आणि उत्सव हे निसर्गाशी कसे निगडित आहेत याचा आलेख अभ्यासपूर्ण रित्या पोहरकर यांनी मांडला.  जैविक तसेच निर्जीव सृष्टी यांचा परस्पर पूरक संबंध एकूणच पर्यावरण विषयक कसा आहे याचा उलगडा त्यांनी व्याख्यानातून केला. मानवी जीवनच नव्हे तर पृथ्वीवरील सर्वच सजीव प्रजाती आणि निर्जीव समजल्या जाणाऱ्या भौतिकी वस्तूंचाही एकमेकांशी घनिष्ठ संबंध असून यांच्यातील कोणताही एक दुवा निखळला तरीही पृथ्वीचे पर्यावरण बिघडते आणि पर्यायाने सर्वच जीवसृष्टी आणि पृथ्वी ही धोक्यात येते. यावरील उपाय योजना म्हणून वैश्विक पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न कसा करता येईल याबाबत माहिती व जाणीव प्रशिक्षणार्थींना दिली. दरम्यान दृर्कश्राव्य माध्यमातून विषयाचे विश्लेषण अरविंद पोहरकर यांनी मांडले.

०००००

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ