आयटीआय (मुलींची) अकोला येथे प्रवेश प्रक्रिया समुपदेशन केंद्राचे उद्घाटन



 अकोला, दि.१५(जिमाका)- स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची ) अकोला येथे २०२३ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व व्यवसाय निवडीबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. 

शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात समुपदेशन केंद्रामध्ये आय.टी.आय (मुलींची) अकोलाच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भातील   तसेच संस्थेत उपलब्ध विविध व्यवसाय व त्या  संदर्भातील माहिती ही या समुपदेशन केंद्रामार्फत प्रवेशा करिता उत्सुक असलेल्या प्रत्येक महिला व मुलींना आणि त्यांच्या पालकांना  प्रदान करण्यात येईल व त्याकरिता हे केंद्र कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील,अशी माहिती दिली. प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी या वेळी प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी  उपस्थित असलेल्या मुली आणि त्यांच्या पालकांचे स्वागत केले.  संस्थेचे माहितीपत्रक उपस्थित प्रवेशोत्सुक मुलींना आपल्या हस्ते प्रदान केले. नोंदणी बुकात त्यांची नोंद घेऊन स्वतः त्यांचे समुपदेशन केले.यावेळी संस्थेच्या गटनिदेशिका रेखा रोडगे उपस्थित होत्या.  समुपदेशन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी  शिल्पनिदेशक प्रशांत बोकाडे, अरविंद पोहरकर, लक्ष्मण जढाळ,गजानन गावंडे,निलेश पन्हाळकर , प्रवीण जुमळे, नंदकिशोर मासोदकर तसेच संस्थेत कार्यरत सर्व व्यवसायाचे शिल्पनिदेशक , कार्यालयीन कर्मचारी वृंद आणि प्रवेश घेण्यास उत्सुक असलेले पालक आणि त्यांची पाल्य  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम