राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन व स्वागत


अकोला, दि. 10(जिमाका)- राज्यपाल रमेश बैस यांचे आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. यावेळी जिल्हाप्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पुप्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदिप घुगे,उपविभागीय अधिकारी शरद जावळे, रामेश्वर पुरी, मंडल रेल प्रबंधक धीरेंद्रसिंह, तहसिलदार सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस यांच्या आगमनानंतर पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ते नियोजित कार्यक्रमाकरिता रवाना झाले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा