ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणुक; आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहिर


अकोला, दि.13 (जिमाका)-  राज्‍य निवडणूक आयोगाने जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच चुकीची प्रभागरचना/आरक्षण झाल्याने निवडणूक होऊ न शकलेले 14 ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहिर झाला आहे, अशी माहिती ग्रा.पं.,जि.प.,पं.स. निवडणुक प्रभारी अधिकारी शरद जावळे यांनी दिली आहे.

आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम याप्रमाणे :

1. शुक्रवार दि. 16 जून रोजी आरक्षण सोडत काढण्याकरिता विशेष ग्रामसभेची सूचना देणे.

2. बुधवार दि. 21 जून रोजी विशेष ग्रामसभा बोलवून, तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्‍या अधिकाऱ्याच्या अध्‍यक्षतेखाली अनु,जाती महिला, अनु. जमाती महिला, नामाप्र, नामाप्र महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत काढणे.

3. शुक्रवार दि.23 जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला(नमुना ब) जिल्‍हाधिकारी यांनी मान्‍यता देणे.

4.  सोमवार दि. 26 जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्‍दी करणे.

5. मंगळवार दि. 27 जून ते 3 जुलैपर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्‍याचा कालावधी.

6. शुक्रवार दि. 7 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्‍त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे.

7. बुधवार दि. 12 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्‍हा‍धिकारी यांनी मान्‍यता देणे.

8. शुक्रवार दि.14 जुलै रोजी जिल्‍हाधिकारी यांनी मान्‍य केलेल्‍या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्‍यापक प्रसिध्‍दी देणे.

मुदत संपणाऱ्या तालुक्यानिहाय ग्रामपंचायती याप्रमाणे : तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेड, झरीबाजार व बारुखेडा, मुर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी व गाजीपूर(टाकळी), अकोला तालुक्यातील काटीपाटी, एकलारा, कापशी रोड व मारोडी, बार्शीटाकळी तालुक्यातील खोपडी, दोनद खु., खांबोरा जांभरुन तर पातुर तालुक्यातील कोसगांव ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहिर झाला आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ