जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी नोंदणी करण्याचे आवाहन


  अकोला,दि.23(जिमाका)-  जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होत असते. व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा सन 2024 मध्ये ल्योन (फ्रान्स) येथे होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील 23 वर्षाखालील पात्र युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या कौशल्यांचे सादरीकरण करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

          जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 23 वर्ष ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार स्पर्धकाचा जन्म दि. 1 जानेवारी 2002 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक राहिल. तसेच ॲडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन अँड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा असावा.

            जागतिक कौशल्य स्पर्धेत नोंदणीसाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in लिंक देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुसरा माळा, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अकोला येथे संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ