सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


अकोला,दि.23(जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस दि. 26 जून रोजी “सामाजिक न्याय दिन” साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यक्रम सोमवार दि. 26 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री.आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालय येथील सभागृह, अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

कार्यक्रम याप्रमाणे : रविवार दि. 26 जून, 2022 रोजी सकाळी 8 वाजता महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी यांचे समता दिंडीस मान्यवरांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. समता दिंडीचा मार्ग: जिल्हाधिकारी कार्यालय परिसर-सर्वोपचार रुग्णालय मार्ग-अशोक वाटिका येथे विसर्जन होईल. तसेच सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रम श्री.आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालय येथे सोमवार दि. 26 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभाग अमरावतीचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त अमोल यावलीकर, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ