शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी




अकोला दि. 1 (जिमाका)- शासकीय वैदयकीय महाविद्यालय व जिल्हा एडस नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महिला राज्यगृह, गायत्री बालीकाश्रम व शासकीय बालगृहातील प्रवेशीतांची एसटिआय, हॅपीटायटीज बी व सी च्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये महिला राज्यगृहातील 36 महिला, शासकीय बालगृहातील 19 बालके व गायत्री बालिकाश्रमातील 35 प्रवेशीतांची तपासणी यावेळी करण्यात आली.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  विलास मरसाळे, श्रीमती मीना प्रधान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतुषार वारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दर्शन जनईकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. आरोगय तपासणी पथकामध्ये माधुरी येळणे, जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर भेडेकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुमेरा खान, साक्षी हेरोळे, अमृता इंगोले यांनी सहभाग घेतला. त्यांनतर समुपदेशीका माधुरी येळणे यांनी प्रवेशीतांना वैयक्तीक स्वच्छता व आरोग्याची निगा याबाबत समुपदेशन व मार्गदर्शन केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय महिला राज्यगृहाचे अधिक्षक गिरीश पुसदकर, शासकीय बालगृहाच्या अधिक्षक जयश्री हिवराळे, समुपदेशक नंदन शेंडे, अनिल इंगोले, गायत्री बालीकाश्रमाच्या वैशाली भारसाकळे, भाग्यश्री घाटे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे राजू लाडूलकर, सुनिल लाडुलकर यांनी प्रयत्न केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ