सैनिकी वसतीगृहात प्रवेश सुरु; 30 जूनपर्यंत अर्ज मागविले


अकोला,दि.7(जिमाका)- येथील सैनिकी मुलांमुलींचे वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांकरीता इयत्ता 10 वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने प्रवेश घेणाऱ्या इच्छुक सैनिकांच्या पाल्यांनी शुक्रवार दि. 30 जूनपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

            सेनिकी वसतीगृहात प्रवेश घेण्याकरीता विहीत नमुन्यातील अर्ज मुलामुलींचे वसतिगृह, आकाशवाणी चौक, सिव्हील लाईन, अकोला येथे उपलब्ध आहेत. अकोला शहराबाहेर वास्तव्य करणाऱ्या ग्रामीण व इतर भागातील आजी/ माजी  सैनिकांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल. या संधीचा जास्तीत जास्त आजी/माजी  सैनिकाच्या पाल्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहीतीसाठी मुलांचे वसतीगृह 0724- 2456062 मुलींचे वसतीगृह 0724- 2450383 दुरध्वनी क्रमांकावर अथवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ