जड वाहन प्रवेश बंदी व शिथीलता करण्यासंदर्भात अधिसूचना जाहीर; सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत जडवाहनांना प्रवेशबंदी


अकोला, दि.19 (जिमाका)- शहरातील जड वाहन, प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस यांना पोलीस विभागाव्दारे निश्चित केलेल्या मार्गावर प्रवेश बंदी तसेच प्रवेश बंदी शिथील करण्यासंबंधी प्रस्तावित केले आहे. त्याअनुषंगाने अकोला महानगराच्या बाहेरुन येणारे तसेच शहरअंतर्गत मार्गावरील जड वाहन, प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस यांना सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेश बंदी तसेच जिवनावश्‍यक/अत्‍यावश्‍यक वस्‍तुची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत शिथीलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

आदेशात म्हटल्याप्रमाणे : अकोला शहरातील मार्गावर जड वाहनांना वाहतुकीकरीता रात्री 10 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत मोकळीक देऊन, जड वाहनांचे वाहतुकीकरीता शहरातील मार्गावर सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पुर्णपणे प्रवेश बंदी करुन निवडक मार्गावर शहरात जिवनावश्‍यक/अत्‍यावश्‍यक वस्‍तुची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत शिथीलता देण्‍याची तसेच शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बसेस यांना प्रवासी चढ-उतार करण्‍याकरीता निश्चित केलेल्या मार्गाचे वापर करण्‍याचे पोलीस विभागाने प्रस्तावित केले आहे.

प्रस्तावित वेळापत्रक याप्रमाणे :

अ.क्र

अकोला महानगराचे बाहेरुन येणारे मार्ग

प्रस्‍तावित प्रवेश बंदीची वेळ

1

बाळापूर नाका-भांडपुरा चौक-किल्‍ला चौक

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

2

वाशिम बायपास-हरीहरपेठ येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

3

उमरी नाका-टावर चौक कडे येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

4

आपातापा चौक ते शिवाजी पार्ककडून कोतवाली चौक कडे येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

5

मलकापूर-गौरक्षण रोड- हुतात्‍मा चौक-अशोक वाटिका मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

6

डाबकी रोड रेल्‍वे गेट कडुन शहरात येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

7

पोलीस मुख्‍यालय-सिटी कोतवाली कडे येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

8

वाशिम बायपास-भगतसिंग चौक - कडून नेहरु पार्क येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 14.00 पावेतो

दुपारी 16 ते 22 वा. पावेतो

9

कौलखेड ते भगतसिंग चौक ते अशोक वाटिका कडे

सकाळी 8 ते 14 पावेतो

दुपारी 16 वा ते 22 वा. पावेतो

10

शिवणी कडून – नेहरु पार्क चौक – अशोक वाटिका कडे येणारा मार्ग

सकाळी 8.00 ते 14.00 पावेतो

दुपारी 16 ते 22 वा. पावेतो

11

आपातापा चौक – रेल्‍वे स्‍टेशन चौक ते अशोक वाटिका चौक कडे

सकाळी 08.00 ते 14.00 पावेतो

दुपारी 16 ते 22 वा. पावेतो

टिप : अ.क्र.8 ते 11 मधील मार्गावर दुपारी 14.00 ते दुपारी 16.00 पर्यंत जड वाहनांस शिथीलता देण्‍यात आली आहे.

अ.क्र

अकोला शहर अंतर्गत मार्ग

प्रस्‍तावीत प्रवेश बंदीची वेळ

1

रेल्‍वे स्‍टेशन माल धक्‍का ते पो.स्‍टे रामदास पेठ कडून दामले चौक ते फतेह अली चौक मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

2

अकोट स्‍टॅण्‍ड कडून अग्रसेन चौक कडे जाणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

3

भांडपुरा चौक – डाबकी रोड कडे जाणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

4

शालीनी टॉकीज (सिटी कोतवाली चौक) आपातापा चौक

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

5

दगडी पुल – माळीपुरा चौक – मामा बेकरी टी पॉईंट – बियाणी चौक पर्यंत

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

6

जठारपेठ ते अग्रसेन चौक

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

7

टॉवर चौक ते फतेह चौक कडे जाणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

8

नेहरु पार्क ते रतनलाल प्‍लॉट चौक

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

 

अ.क्र

अकोला शहरामध्‍ये येणाऱ्या मिनी लक्‍झरी बसेस करीता मार्ग

प्रवासी चढ – उतार करणे करीता नेमलेले ठिकाण

1

खामगाव – बाळापूर – अकोला या मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस

नमूद लक्‍झरी वाहतूक करणारे हे लक्‍झरी बस स्‍टॅण्‍ड, निमवाडी – जेल चौक - ओव्‍हर ब्रिज वरुन चढून – अग्रसेन जवळ उतरुन – शास्‍त्री स्‍टेडीयमच्‍या मागचे बाजुला (न्‍यु ईरा शाळेच्‍या समोरील बाजूला) येथे थांबून प्रवासी उतरवतील व तेथूनच प्रवासी घेऊन अग्रसेन चौक – ओव्‍हर ब्रीज – जेल चौक – निमवाडी मार्गे परत जातील.

2

वाशिम – पातूर – अकोला या मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस

नमूद लक्‍झरी वाहतूक करणारे हे लक्‍झरी बस स्‍टॅण्‍ड, निमवाडी – जेल चौक - ओव्‍हर ब्रिज वरुन चढून – अग्रसेन जवळ उतरुन – शास्‍त्री स्‍टेडीयमच्‍या मागचे बाजुला (न्‍यु ईरा शाळेच्‍या समोरील बाजूला) येथे थांबून प्रवासी उतरवतील व तेथूनच प्रवासी घेऊन अग्रसेन चौक –ओव्‍हर ब्रीज –जेल चौक – निमवाडी मार्गे परत जातील.

3

अकोट - अकोला या मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस

नमूद लक्‍झरी वाहतूक करणारे हे आपातापा चौक-रेल्‍वे पुल- मालधक्‍का चौक-शास्‍त्री स्‍टेडीयमच्‍या मागचे बाजुला (न्‍यु ईरा शाळेच्‍या समोरील बाजूला) येथे थांबून प्रवासी उतरवतील व तेथूनच प्रवासी घेऊन मालधक्‍का चौक-रेल्‍वे पूल-आपातापा चौक मार्गे परत जातील.

4

बैतूल-परतवाडा-दर्यापूर-अकोला/ बैतूल-परतवाडा-अकोट-अकोला या मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस

नमूद लक्‍झरी वाहतूक करणारे हे आपातापा चौक- रेल्‍वे पुल - मालधक्‍का चौक - शास्‍त्री स्‍टेडीयमच्‍या मागचे बाजुला      (न्‍यु ईरा शाळेच्‍या समोरील बाजूला) येथे थांबून प्रवासी उतरवतील व  तेथूनच प्रवासी घेऊन मालधक्‍का चौक - रेल्‍वे पूल - आपातापा चौक मार्गे परत जातील.

5

बार्शिटाकळी मार्गे-अकोला मध्‍ये येणारे लक्‍झरी बसेस

नमूद लक्‍झरी वाहतूक करणारे हे जेल चौक - ओव्‍हर ब्रिज वरुन चढून - अग्रसेन जवळ उतरुन - शास्‍त्री स्‍टेडीयमच्‍या मागचे बाजुला (न्‍यु ईरा शाळेच्‍या समोरील बाजूला) येथे थांबून प्रवासी उतरवतील व तेथूनच प्रवासी घेऊन अग्रसेन चौक - ओव्‍हर ब्रीज - जेल चौक परत जातील.

6

अमरावती – मुर्तीजापूर – अकोला या मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस

नमूद लक्‍झरी वाहतूक करणारे हे नेहरु पार्क- अशोक वाटिका-ओव्‍हर ब्रिज वरुन चढून-अग्रसेन जवळ उतरुन - शास्‍त्री स्‍टेडीयमच्‍या मागचे बाजुला (न्‍यु ईरा शाळेच्‍या समोरील बाजूला) येथे थांबून प्रवासी उतरवतील व

तेथूनच प्रवासी घेऊन अग्रसेन चौक - ओव्‍हर ब्रीजवर चढून - मुर्तीजापूर कडे जाणाऱ्या पुलावरुन खाली उतरुन नेहरु पार्क मार्गे परत जातील.

 

अ.क्र

अकोला शहरामध्‍ये येणाऱ्या मोठ्या लक्‍झरी बसेस करीता मार्ग

प्रवासी चढ - उतार करणे करीता नेमलेले ठिकाण

1

नागपूर-अमरावती-मुर्तिजापूर मार्गे अकोला शहरामध्‍ये येणाऱ्या व बाळापूर मार्गे पुणे, मुंबई कडे जाणाऱ्या लक्‍झरी बसेस अथवा  पुणे, मुंबई, वाशिम कडून अकोला कडे येणाऱ्या व अमरावती नागपूर कडे जाणाऱ्या लक्‍झरी बसेस

नमूद लक्‍झरी बसेस हे रामलता चौक - नेहरु पार्क -हुतात्‍मा चौक - ओव्‍हर ब्रीज वर चढून-निमवाडी लक्‍झरी बस स्‍टॅण्‍ड येथे थांबतील (बाळापूर किंवा पातूर कडे जाणेकरीता- वाशिम बायपास मार्गे जातील) व परत नागपूर कडे जाणेकरीता निमवाडी लक्‍झरी बस स्‍टॅण्‍ड - ओव्‍हर ब्रीज वर चढून - हुतात्‍मा चौक - नेहरु पार्क - रामलता चौक मार्गे नागपूर कडे जातील

 

शासकीय, निमशासकीय व महामंडळाच्या जड वाहनांना प्रतिबंधातून सूट 

1.    केंद्र शासन व राज्‍य शासन, अकोला महानगरपालिका अकोला, जिल्‍हा परिषद अकोला किंवा इतर महामंडळाच्‍या मालकीची शासकीय कामासाठी फिरणारी वाहने.

2.   अग्‍नीशमन दल, सैन्य दल तसेच केंद्र व राज्‍य शासनाचे पोलीस दलाचे जडवाहन.

3.   केंद्र शासन, राज्‍य शासन, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था व महामंडळे यांचेव्‍दारे शासकीय कामात कायदेशिररित्‍या गुंतलेली खाजगी जड वाहने.

4.  दुध, पेट्रोल, डिझेल, केरोसीन, गॅस सिलेंडर यासारख्‍या जीवनावश्‍यक वस्‍तुचा अकोला शहरात पुरवठा करणारी जडवाहने

5.  सर्व प्रकारच्‍या प्रादेशिक परिवहन विभागाकडून मान्‍यताप्राप्‍त शाळा / महाविद्यालये यांची बसेस

6.   प्रवाशी वाहतूक करणारी महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळ व इतर राज्‍यातील महामंडळाच्‍या सर्व प्रकारच्‍या बसेस

7.  शासकीय कामात गुंतलेले जड वाहने (सदर वाहनावर ON GOVT. DUTY असा फलक लावण्‍याची अट राहिल तसेच जड वाहन चालकाकडे जिल्‍हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला यांची परवानगी घेणे बंधनकारक राहिल)

8.   गौण खनिज वाहतूक करणारी जड वाहने यांना गौणखनिज नियमावली, शासन निर्णय, शासन परिपत्रक तसेच वेळोवेळी निर्गमीत करण्‍यात येणाऱ्या आदेशातील तरतुदी लागू राहतील. 

जडवाहन चालक, मालक व ट्रक असोसिएशन यांना

 वाहतूक नियमाचे पालन करणे बंधनकारक

1.    ट्रक चालकांनी त्‍यांचे ट्रक रोडच्या डाव्‍या बाजूचे लेनने रोडचे कडेकडून चालवतील व रोडचे डिव्‍हायडर कडील बाजू मोकळी ठेवावे.

2.   ट्रक चालकाने त्‍यांचे ट्रक हे अकोला शहराचे हद्दीतून ताशी 30 कि.मी प्रति वेगाने एका पाठोपाठ एक डावे लेनमधूनच रोडच्या कडेने चालवावे.

3.   अकोला शहरातील ट्रक ओनर्स अॅण्‍ड ब्रोकर असोसिएशन, लोकल ट्रक ओनर्स असोसिएशन, ट्रक्‍स युनिटी, लक्‍झरी ट्रान्‍सपोर्ट व इतर ट्रान्‍सपोर्ट ओनर्स यांना सुचना देण्‍यात येते की, त्‍यांनी ट्रक चालकांना वरील अटी प्रमाणे सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्‍याकरीता सुचना देतील.

4.  अधिसूचनेचे उल्‍लंघन करणारे वाहनांवर मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 179, 184 अंतर्गत प्रमाणे शुल्‍क आकारणी करण्‍यात येईल.

अकोला रेल्‍वे स्‍टेशन मालधक्‍कावरुन वाहतूक करण्यास शिथीलता

मौजे शिवणी-शिवर येथील रेक पॉईटवर पायाभूत सुविधांची उभारणी होईपर्यंत अकोला रेल्‍वे स्‍टेशन परिसरातील मालधक्‍का पुर्ववत सुरु करण्‍यात आला आहे. याठिकाणाहून जीवनावश्‍यक वस्‍तु, शेती उपयुक्‍त रासायनिक खते व इतर अनुषंगीक आवश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा नियमित होण्‍याच्‍या दृष्‍टीने तेथील जड वाहनांचे वाहतूकीकरीता रात्री साडेदहा ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत शिथीलता देण्‍यात आली आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ