जिल्ह्यात कलम 36 अन्वये स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान
अकोला,दि. 14(जिमाका)- जिल्ह्यात
गुरुवार दि. 29 जून रोजी बकरी ईद (ईद ऊल अझहा) उत्सव साजरे करण्यात येणार आहे. या
कालावधीमध्ये शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक
संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये
जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या पेक्षावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना
सोमवार दि. 26 जूनचे रात्री 12 वाजेपासून ते 1 जुलै 2023 च्या रात्री 12
वाजेपर्यंत अधिकार प्रदान केले आहेत.
आदेशात नमूद केल्यानुसार, रस्त्यावरुन जाणाच्या मिरवणुकीतील
किंवा जमावातील लोक अशा रितीने चालतील त्यांची वर्तणूक कशी असावी या विषयी निर्देश
देणे. मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व
जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा
सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा
अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवून न देणे. अशा
कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा त्या मार्गाने जावू नयेत ते विहीत
करणे, सर्व रस्त्यावर व नद्यांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे
धूण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर
सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था
राखणे, कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ
वाद्य वाजविण्यावे किंवा गाण्याचे किंवा ढोल, ताश, शिट्टया व इतर कर्कश वाद्य वाजविणे इत्यादी बाबत नियम
तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा
सार्वजनिक उपहाराच्या (अतिथीगृहाच्या) जागेत ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकर) उपयोग करण्याचे
नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमांचे कलम 33,36,37 ते 40,42,43 व 45 अन्वये
कलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पूष्टी देणारे योग्य आदेश देणे इ.
अधिकारांचा समावेश आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलीस आधिनियम कलम 134 प्रमाणे
शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा