दुकाने, आस्थापना सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत सुरु राहणार: ‘ब्रेक द चेन’,अंतर्गत जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश
अकोला, दि.३१(जिमाका)- अकोला जि ल्ह्या त कोविड रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑ क्सि जन बेडची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणा ऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता Break The Chain अंतर्गत अकोला जि ल्ह्या करिता मंगळवार दि. १ जून चे सकाळी सात वाजल्यापासून ते मंगळवार दि.१५ जुनचे रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंधासह आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत . राज्यातील कोविड- १९ च्या दुस ऱ्या लाटे ची स्थिती लक्षात घेता , राज्याचे मुख्य सचिव यांनी सुधारीत सुचना निर्गमित केल्या असुन त्यानुसार राज्यातील निर्बंधांचा कालावधी मंगळवार दि. १५ जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानिर्देशानुसार आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यानंतर आदेश निर्गमित करण्यात आले. या आदेशात म्हटल्यानुसार, अ . निर्बंधासह सुरु ठेवण्यात आलेल्या अत्यावश्यक / बिगर अत्यावश्यक सेवा. अ.क्र. बाब निश्चित करण्यात आलेली वेळ १ सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने/किरा...