मुर्तिजापूर तालुक्यातील चार संस्था अवसायनात
मुर्तिजापूर तालुक्यातील चार संस्था अवसायनात
अकोला,दि. २३ : सहकारी संस्था सहायक निबंधकांकडून मूर्तिजापूर तालुक्यातील चार सहकारी संस्था अवसायनात ठरविण्यात आल्या असून, तशी नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याकरिता अवसायकांची अंतिम सभा दि. १९ ऑगस्ट रोजी दु. १ वा. मुर्तिजापुर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील सहायक निबंध सहकारी संस्था येथे ठेवण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील मानाता येथील जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था, हिरपूर येथील महाराणा प्रताप गृह तारण सहकारी संस्था व शासकीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. तसेच श्री साईनाथ गृह तारण सहकारी संस्था मर्या. या चार संस्था अवसायनात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंतिम सभेस संस्थेच्या संचालक मंडळांनी संपूर्ण रेकॉर्डसह वेळेत उपस्थित रहावे. आपण सभेत हजर न राहिल्यास आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून संस्थेची नोंदणी रद्द करण्याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी, असा इशारा सहायक निबंधक अनिल एस. शास्त्री यांनी दिला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा