सहकार पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत प्रस्ताव द्यावे जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

 

 

सहकार पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत प्रस्ताव द्यावे

जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

 

अकोला, दि.२२: सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना यंदापासून पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी दि. ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

 

पुरस्कारासाठी वर्ष २०२३ - २४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर प्रस्ताव दाखल करावयाचे आहेत. तसे  प्रस्ताव सहकारी संस्थांनी संबंधित तालुका सहाय्यक निबंधक, उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करावेत. पुरस्कारांमध्ये १ सहकारमहर्षी, २ सहकारभूषण, २३ सहकारनिष्ठ अशा ४५ पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे एक लाख, ५१ हजार व २५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असणार आहे. नोंदणी, वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा, नफा-तोटा, थकबाकी, संस्थेवरील कायदेशीर कारवाई, लेखापरीक्षण, निवडणूक व्यवस्थापन, निधीची गुंतवणूक, प्रशिक्षण यासाठी ५० गुण आहेत. संस्था प्रकारनिहाय निश्चित केलेल्या विशेष निकषांसाठी ३० तर सहकारी संस्थेसाठी योगदान, जनतेसाठी दिलेले योगदान, विकासासाठी प्रयत्न आदींसाठी २० गुण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणी झालेल्या सहकारी संस्था यासाठी अर्ज करू शकतात. सहकारी संस्थांनी प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण. एच. लोखंडे यांनी केले आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा