सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुकीसाठी पॅनेल तयार करणार इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुकीसाठी पॅनेल तयार करणार
इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन
अकोला,दि.२३ : सहकारी गृहनिर्माण संस्थेत ई वर्गातील संस्था म्हणजेच
२५० पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थेची दि. २१ जुलै ते २१ ऑगस्ट
२०२५ या कालावधीकरीता निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पॅनल तयार करण्याकरीता
दि. २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी
संस्थेचे जे.एस. सहारे यांनी केले आहे.
हे अर्ज शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कार्यरत
अधिकारी-कर्मचारी (वरीष्ठ लिपीक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेला कर्मचारी), प्रमाणीत
लेखापरिक्षक, वकील,शासकीय किंवा स्थानिक संस्थेकडून निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचारी
(वयाची ६५ वर्ष पेक्षा जास्त नसलेल्या) यांचेकडून मागविण्यात येत आहेत. विहित नमून्यातील
अर्ज २१ ऑगस्टपर्यत (शासकीय सुटीचे दिवस वगळून) आदर्श कॉलनी येथील सहकार संकूल मधील
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था येथे पाठवावे. याबाबतची जाहीर सूचना विभागीय सहनिबंधक
सहकारी संस्था अमरावती व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या कार्यालयाच्या
नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा