भटक्या प्राण्याकरिता निवारागृहासाठी अर्ज करण्याचे आवाहन

भटक्या प्राण्याकरिता निवारागृहासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

अकोला,दि.४ : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अंतर्गत कापशी तालुक्यातील भटक्या प्राण्याकरिता सेवाभावी तत्वावर निवारागृह चालविण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी दि.५ ते १५ जुलै दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अभिजीत परंडेकर यांनी केले आहे. अर्जाचा नमुना, अटी व शर्ती https://dahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज कार्यालयीन वेळेत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय येथे स्वीकारण्यात येतील किंवा पोस्टाने पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा