जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य विभागाच्या विविध बैठका लिंगनिदान प्रतिबंधासाठी ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ राबवावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य विभागाच्या विविध बैठका
लिंगनिदान प्रतिबंधासाठी ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ राबवावी
-
जिल्हाधिकारी
अजित कुंभार
अकोला, दि. 29 : सीआरएस
अहवालानुसार अकोला जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा होऊन एक हजार
पुरूषांमागे ९४० महिला इतके प्रमाण झाले आहे. या कार्यात अधिक सुधारणांसाठी
सोनोग्राफी सेंटरच्या अचानक तपासण्या, धाडी यांची संख्या वाढवावी, तसेच ‘ट्रॅकिंग
सिस्टीम’ राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
पीसीपीएनडीटी जिल्हा टास्क फोर्स, जिल्हा एड्स नियंत्रण समिती, राष्ट्रीय
तंबाखू नियंत्रण बैठक, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम आदी विविध बैठका
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या तिस-या
मजल्यावरील सभागृहात झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी
अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, डॉ. आशा मिरगे, मोहन खडसे, डॉ. सीमा तायडे, प्रतिभा
अवचार, समितीच्या विधी समुपदेशक ॲड. शुभांगी ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, लिंगनिदान प्रतिबंधासाठी
तपासण्यांबरोबरच ट्रॅकिंग करणेही गरजेचे आहे. त्यासाठी आशा सेविकांची भूमिका
महत्वपूर्ण आहे. याबाबत जाणीवजागृती होणे आवश्यक आहे. गरोदर मातांविषयीचा डेटा,
आवश्यक ट्रॅकिंग ही जबाबदारी, तपासण्या व मागोवा ही जबाबदारी काटेकोरपणे पार
पाडावी. सोनोग्राफी केंद्रांना अचानक भेटी, धाडी यांची संख्या वाढवावी. प्रारंभी
ॲड. ठाकरे यांनी सोनोग्राफी केंद्रांच्या मान्यता, नूतनीकरण, यंत्रणा हस्तांतरण
आदींबाबतचे अर्ज, नियम यांची माहिती सादर केली.
तंबाखूमुक्त शाळांसाठी मोहिम राबवा : जिल्हाधिकारी
प्रत्येक शाळेचा परिसर तंबाखूमुक्त होण्यासाठी मोहिम राबविण्याचे निर्देश
जिल्हाधिका-यांनी जिल्हा समितीच्या बैठकीत दिले. ते म्हणाले की, पोलीस व विविध
विभागांचे सहकार्य घेऊन शाळा-शाळांचे सर्वेक्षण करावे. जागृतीसाठी मेळावे घ्यावेत.
आवश्यक तिथे कारवाई करावी. सर्व तालुक्यात तंबाखू नियंत्रण समित्यांची स्थापना
करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणा-या किंवा
जोखमीतील व्यक्तींच्या तपासण्या होतात. त्यात जून महिन्यातील २६५ तपासण्यांत २२
व्यक्तींना कर्करोगपूर्व स्थितीचे निदान झाले. त्यांना उपचार, मार्गदर्शन मिळवून
देण्यात आले.
जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रमात २०२४-२०२५ या वर्षात ९५ हजार ३५२
तपासण्या झाल्या.
त्यात २१८ एचआयव्हीबाधित आढळून आले. जोखमीच्या व अतिजोखमीच्या क्षेत्रात
प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवावी व व्यापक तपासण्या कराव्यात, असे निर्देश
जिल्हाधिका-यांनी दिले.
०००
राज्य सरकार इनकम टैक्स पाने के लिए शराब लाइसेंस दुकान दारो को ग्रामीण इलाकों में शराब पेटियां बेचने दे रही है शराब की पेटियों की विक्री खरीददारी करने दे रही है,,,उसके बाद पुलिस रेट होते समय ग्रामीण इलाकों में तस्करो के पास वही शराब अवैध पाई जाती है,,,,यह तो उन अवैध शराब तस्करो पर अन्याय हुआ ,,,
उत्तर द्याहटवा