मूर्तिजापूर पं. स. तर्फे सौर यंत्र व पेरणी यंत्र वितरित करणार गुरूवारी सोडत
मूर्तिजापूर पं. स. तर्फे
सौर यंत्र व पेरणी यंत्र वितरित करणार
गुरूवारी सोडत
अकोला, दि. १५ : मूर्तिजापूर पंचायत
समितीतर्फे शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर सौर, वीज झटका यंत्र व मनुष्यचलित पेरणी
यंत्र वितरित करण्यात येणार आहेत. त्याच्या लाभार्थी निवडीसाठी सोडत दि. २४ जुलै रोजी
पं. स. सभागृहात होणार आहे.
झटका यंत्रासाठी दिव्यांग लाभार्थीचे
२२ व सर्वसाधारण लाभार्थीचे १ हजार १९२ असे एकूण १ हजार २१४ अर्ज प्राप्त आहेत. मनुष्यचलित
पेरणीयंत्रासाठी दिव्यांग लाभार्थीचे ८ व सर्वसाधारण लाभार्थीचे ४६४ असे एकूण ४७२ अर्ज
प्राप्त झाले आहेत. या अर्जांमधून लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा