आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त अकोल्यात ‘रेड रन’ स्पर्धा


 

आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त अकोल्यात ‘रेड रन’ स्पर्धा

अकोला, दि. २५ :  आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवकांमध्ये एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृतीसाठी जिल्हा एड्स प्रतिबंधक पथक व क्रीडा कार्यालयातर्फे दि. ३ ऑगस्ट रोजी वसंत देसाई क्रीडांगण येथे ‘रेड रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

वयोगट १७ ते २५ वर्षांदरम्यानच्या युवकांना त्यात विनामूल्य सहभागी होता येईल. स्पर्धेचे अंतर ५ किलोमीटर असेल. पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीसे व प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित कोड स्कॅन करूनही नोंदणी करता येईल.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन