जलद व्यवहारांसाठी टपाल कार्यालयात ‘आयटी २.०’
जलद व्यवहारांसाठी
टपाल कार्यालयात ‘आयटी २.०’
अकोला, दि. २२ : भारतीय टपाल विभागाने टपाल सेवांमध्ये डिजिटल परिवर्तन
घडवण्यासाठी आय.टी २.० उपक्रमात एटीपी ॲप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागू केली असून, येत्या
५ ऑगस्ट रोजी अकोला व वाशीम जिल्ह्यातील सर्व शाखा व उप टपालघरांमध्ये अंमलबजावणी होणार
आहे. याबाबत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील टपाल कार्यालये
४ ऑगस्टला बंद राहतील.
नव्या प्रणालीमुळे व्यवहार जलद, अचूक व ग्राहकाभिमुख होणार असल्याचा
विश्वास प्रवर अधिक्षकांनी व्यक्त केला.
त्यासाठी डेटा स्थलांतराची प्रक्रिया ४ ऑगस्ट रोजी होणार असून, त्या
दिवशी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक सेवा ४ ऑगस्टपूर्वीच
मिळविण्याचे आवाहन प्रवर अधिक्षकांनी केले
आहे.
टपाल कार्यालय एक दिवस बंद राहणार असले तरी भविष्यातील सेवा अनुभव अधिक
सक्षम व डिजिटल होईल, अशी ग्वाही विभागाने व्यक्त केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा