बार्शीटाकळीतील शासकीय विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश सुरू

 बार्शीटाकळीतील शासकीय विद्यार्थी

वसतिगृहात प्रवेश सुरू

 

अकोला, दि. ९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

इयत्ता आठवी ते पदवीपर्यंत बार्शीटाकळी येथे शिक्षण घेत असलेल्या बाहेरगावातील विद्यार्थ्यांना टक्केवारीनुसार वसतिगृहात रिक्त जागेनुसार प्रवेश मिळू शकेल. वसतिगृहात विद्यार्थ्यांना राहण्याची, भोजन सुविधा मोफत पुरविण्यात येते. तसेच शैक्षणिक साहित्य भत्ता, गणवेश भत्ता व मासिक निर्वाह भत्ता दिला जातो.

इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर भरून शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, आधारपत्र, बँकेचे खाते, गुणपत्रिका व रहिवाशी दाखला इत्यादी कागदपत्रे वसतिगृहात अर्जासोबत सादर करावे, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी बार्शिटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहात किंवा ८३०८०५८८३३ वर संपर्क साधावा.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा