अकोला जिल्हा बाल शोषण मुक्त होण्यासाठी जनजागृती कार्यक्रम व कायदेविषयक मार्गदर्शन
सविस्तर माहिती अशी की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बालविकास कार्यालय, आणि ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस अकोला यांच्या संयुक्त विधमाने जनजागृती कार्यक्रम तसेच कायदेविषयक व शासकीय योजना विषयक मार्गदर्शन कार्यक्रम जागेश्वर विधालय व महाविद्यालय वाडेगाव येथे घेण्यात आला. दिवसेंदिवस वाढते बाल लैंगिक अत्याचार, बाल विवाह, बाल तस्करी, बाल कामगार थांबविण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा च्या श्रीमती आर. एन. बंसल यांनी गुन्हा म्हणजे काय, तसेच बालकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नवे या साठी सुरक्षात्मक उपाय योजना तसेच विभक्त कुटुंब झालेल्या पालकांना मोफत सल्ला दिल्या जाते याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कायदेविषयक मार्गदर्शन उपमुख्य लोक अभिरिक्त जिल्हा न्याय चे प्रवीण होनाळे यांनी बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कडून पीडित बालकांना विविध सोयी सुविधा व मार्गदर्शन केल्या जाते. इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रीय आपत्कालीन सेवा चाईल्ड लाईन 1098 बद्दल माहिती हर्षाली गजभिये यांनी दिली. शाळेचे मुख्याध्यापक गोपाल मानकर यांनी आई वडिलांचे आदर्श, त्यांचे कष्ट बालकांनी डोळ्या समोर ठेवून यशस्वी व्हावे या विषयी मार्गदर्शन केले. सपना गजभिये समन्वयक सपोर्ट पर्सन यांनी बाल विवाह, बाल तस्करी, बाल कामगार आणि बाल लैंगिक शोषण मुक्त अकोला जिल्हा होण्यासाठी उपस्थिताना शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रकल्प समन्वयक ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस अकोला चे शंकर वाघमारे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक दराडे यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांचे लाभले. कार्यक्रमाचे आयोजन ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस अकोला यांनी केले.
कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा च्या श्रीमती आर. एन. बंसल यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे उपमुख्य लोक अभिरिक्त जिल्हा न्याय चे प्रवीण होनाळे, शाळेचे मुख्याध्यापक गोपाल मानकर, ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस अकोला, चाईल्ड लाईन टीम, अंगणवाडी सुप्रवायझर, सेविका, मदतनीस, आशा वर्कर उपस्थित होते. त्याचप्रमाणे विध्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा