डी. एल. एड. साठी ऑनलाईन प्रवेश मंगळवारपर्यंत

 

डी. एल. एड. साठी ऑनलाईन प्रवेश मंगळवारपर्यंत

अकोला, दि. २८ : डी. एल. एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि. २९ जुलै रोजी मध्यरात्री १२ वा. पर्यंत सुरू राहील.

चालू शैक्षणिक वर्षासाठी डीएलएड प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन विशेष फेरी सुरू आहे. विद्यार्थ्यांनी दि. २९ जुलै रोजी मध्यरात्री १२ पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वत:च्या लॉग-इनमधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करून स्वत:चे प्रवेशपत्र काढून घेण्यासाठी दि. १ ऑगस्ट रोजी सायं. ६ वा. पर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर तपशील उपलब्ध असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य रत्नमाला खडके यांनी सांगितले.

०००   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा