चांगले उत्पन्न असणा-यांनी शासकीय अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा जिल्हा पुरवठा विभागाचे ‘गिव्ह इट अप’ अभियान
चांगले उत्पन्न असणा-यांनी शासकीय
अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा
जिल्हा पुरवठा विभागाचे ‘गिव्ह इट अप’ अभियान
अकोला, दि.११: सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे गरजूंना स्वस्त अन्नधान्याचे
वितरण होते. अनेकदा उत्पन्न वाढलेल्या किंवा अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीही त्याचा
लाभ घेतात. अशा व्यक्तींनी या अन्नधान्य योजनेतून स्वत:हून बाहेर पडावे यासाठी जिल्हा
पुरवठा विभागातर्फे ‘गिव्ह इट अप’ अभियान राबविण्यात येत आहे.
योजनेत गरजवंत, गोरगरीब व बेरोजगार नागरिकांना स्वस्त दरात दरमहा अन्नधान्य
व आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. गहू, तांदूळ, धान्य, साखर अशा वस्तूंचा लाभ
रास्त भाव दुकानांमार्फत अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना
देण्यात येतो. मात्र ज्यांचे उत्पन्न शासनाच्या निर्धारित निकषांपेक्षा अधिक आहे. अशा
लाभार्थ्यांनी स्वखुशीने ‘गिव्ह इट अप’उपक्रमात सहभागी
होऊन शिधा योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रविंद्र यन्नावार
यांनी केले आहे.
शासनाने शिधापत्रिका लाभासाठी उत्पन्न मर्यादा निश्चित केल्या असून,
अंत्योदय शिधापत्रिकेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा १५ हजार रु., नागरी प्राधान्य कुटुंबासाठी
५९ हजार रुपये व ग्रामीण भागासाठी ४४ हजार रु. आहे. जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी शिधापत्रिका
काढताना कमी उत्पन्न दर्शवले असून, प्रत्यक्षात त्यांचे उत्पन्न अधिक आहे. अशामुळे
गरजू लाभार्थ्यांना शिधा मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा पात्र शिधापत्रिका
धारकांनी स्वतःहून या धान्य योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जे लाभार्थी उत्पन्न मर्यादा वाढूनही धान्याचा लाभ घेत आहेत. त्यांचे
नाव लाभार्थी यादी मधून वळविण्यात येऊन अशी शिधापत्रिका रद्द करून फौजदारी कारवाई करण्यात
येईल. या योजनेसंबंधित नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सर्व
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा