सणांनिमित्त जिल्ह्यात कलम ३६ जारी

 

सणांनिमित्त जिल्ह्यात कलम ३६ जारी

अकोला, दि. १२ : आगामी काळातील सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक अर्जित चांडक यांनी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ नुसार आदेश जारी केला आहे.

पहिला श्रावण सोमवार (२८ जुलै), नागपंचमी (२९ जुलै), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती (१ ऑगस्ट) आदी सण- उत्सव लक्षात घेऊन दि. २६ जुलैच्या रा. १२.०१ पासून ते दि. ८ ऑगस्टच्या रात्री १२ वा. पर्यंत आदेश लागू राहील.

त्यानुसार विहित मार्गाने मिरवणूक, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता व बंदोबस्त, ध्वनीक्षेपक वापर मर्यादा, जमाव शिस्त व नियंत्रण आदींसाठी पोलीस फौजदार व त्याहून वरिष्ठ अधिका-यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सार्वजनिक व सुरक्षितता नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीवर कलम १३४ नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा