राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी







  

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली

जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

अकोला, दि. २५ :  राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीची पाहणी केली.  जिल्हाधिकारी अजित कुंभार यावेळी उपस्थित होते.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा श्री. वाघमारे यांनी अमरावती येथे विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत गुरूवारी घेतला. त्यानंतर आयोगाच्या सुनावणी कामकाजासाठी त्यांचे आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन झाले. सुनावणी कामकाजानंतर त्यांनी नूतन इमारतीची पाहणी केली.

 इमारतीतील आनंदी कक्ष, आवश्यक दस्तऐवज तत्काळ मिळण्यासाठी किऑस्क सुविधा, हिरकणी कक्ष, सूचनाफलक आदी विविध सुविधांची पाहणी श्री. वाघमारे यांनी केली. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल  चिंचोले आदी उपस्थित होते.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा