आईचे दूध- बालकासाठी संजीवनी

 

 

          आईचे दूध- बालकासाठी संजीवनी   

जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक स्तनपान सप्ताह दि.१ ते ७ ऑगस्ट  या कालावधीत स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. 1992 पासून हा सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. २०२५ या वर्षाचे जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य आहे Invest Breast Feeding, Invest In The Future स्तनपाना करिता सुरक्षित वातावरण निर्माण करणे, बाल मृत्यू कमी करणे, पोषण सुधारणा करणे, पहीले सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान करने बाबत प्रोत्साहन देणे करिता जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम व उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ डॉ. कमलेश भंडारी यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉ. तरंगतुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जनजागृतीसाठी नियोजन करून मोहिमेची आखणी केली आहे. 

       स्तनपानामुळे बाळ आणि आई दोघांनाही आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात. आईचे व बाळाचे भावनिक नाते निर्माण होऊन नाते दृढ होते. आईचे दूध कोणत्याही वेळी उपलब्ध होऊ शकते.

स्तनपानाचे बाळाला होणारे फायदे:-पोषक तत्वांनी परिपूर्ण,रोगप्रतिकारशक्ती वाढवते,पचनास सोपे,मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर,दृष्टी सुधारते,टाइप १ मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी,अचानक शिशु मृत्यु सिंड्रोम (SIDS) चा धोका कमी,भावनिक आणि मानसिक विकास बाळाला कानाचे संक्रमणाचा धोका होत नाही

स्तनपानाचे आईसाठी फायदे:-स्तनपान केल्याने गर्भाशय पूर्ववत आकारात येण्यास मदत होते, ज्यामुळे प्रसूतीनंतरचा रक्तस्त्राव कमी होतो. स्तनपान करताना कॅलरी जास्त प्रमाणात बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. , स्तनपान केल्याने स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा (Ovarian cancer) कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. स्तनपान केल्याने हाडांची घनता वाढते आणि हाडांच्या समस्यांचा धोका कमी होतो. स्तनपान करताना आईच्या शरीरातून ऑक्सीटोसिन (Oxytocin) नावाचे हार्मोन बाहेर पडते, ज्यामुळे आईला आराम मिळतो आणि तणाव कमी होतो. स्तनपानामुळे आई आणि बाळ यांच्यात एक खास भावनिक नाते निर्माण होते, जे दोघांसाठीही फायद्याचे असते. स्तनपान हे एक नैसर्गिक आणि खर्चिक नसलेले पोषण आहे, जे आईसाठी सोपे आणि सोयीचे आहे. पाळणा लांबविणे करिता मदत होते

       जिल्ह्यात विविध मार्गाने जनजागृती करण्यात येणार आहे शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. माता बैठक, पालक बैठक, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, महिला पदाधिकारी इत्यादींच्या बैठका घेऊन स्तनपानाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांचे मार्फत घरोघरी भेटी देउन जनजागृती करण्यात येणार आहे,  असे आवाहन  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा