अकोल्याच्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड


 अकोल्याच्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड

अकोला, दि.17 : येथील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू पूनम कैथवास यांची पंजाबमधील पतियाळा येथे होणा-या वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

भारतीय  मुष्टियुद्ध परिषद व भारतीय खेळ प्राधिकरणातर्फे हे प्रशिक्षण पतियाळा येथे होत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिंपिक, कॉमनवेल्थ स्पर्धांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे. पूनम यांची ६० किलो वजन गटात निवड झाली असून, यापूर्वी त्यांना शिवछत्रपती पुरस्कार, अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा सुवर्णपदक व अनेक राष्ट्रीय स्पर्धांत पदक मिळाले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा