सुधारित मोटार वाहन कर १ जुलैपासून लागू
सुधारित मोटार वाहन कर १ जुलैपासून लागू
अकोला, दि. ३ : महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) अधिनियम 2025 अंतर्गत
कलम 5(2) वगळता उर्वरित सर्व तरतुदी 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार
विविध प्रकारच्या वाहनांवरील कर वाढविण्यात आला असून, सर्व वाहनधारक व वाहतूक संघटनांनी
याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
सीएनजी आणि एलपीजीवर चालणाऱ्या खाजगी दुचाकी व चारचाकी वाहनांवर वाहनाच्या
किमतीनुसार एक टक्क्याने कर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे १० लाख रु.पर्यंतच्या वाहनावरील आधीचा ७ टक्के कर
आता ८ टक्के झाला आहे.
त्याचप्रमाणे, २० लाख रुपयांपर्यंतच्या वाहनावरील कर ८ टक्क्यांवरून
९ टक्के करण्यात आला आहे. २० लाखांहून अधिक किंमतीच्या वाहनांवर आता १० टक्के कर आकारण्यात
येणार आहे. हा दर पूर्वी ९ टक्के होता.
बॅटरीवर चालणा-या वाहनाची किंमत ३० लाख रु.पेक्षा अधिक असेल तर ६ टक्के
दराने कर आकारला जाणार आहे.
बांधकाम क्षेत्रासाठी वापरली जाणारी वाहने
बांधकाम क्षेत्रासाठी वापरली जाणारी मोटार वाहने जसे की क्रेन्स, खनित्रे,
प्रोजेक्टर्स, कॉम्प्रेसर यावरील सध्याचा कर वाहनाच्या वजनावर आधारित होता. आता त्याऐवजी
वाहनाच्या किंमतीच्या ७ टक्के इतका एकरकमी कर आकारण्यात येणार आहे.
हलकी मालवाहतूक वाहने
ज्या वाहनांचे नोंदणीकृत वजन साडेसात हजार किलोपेक्षा कमी आहे अशा मालमोटारींवरील
कर आता वाहनाच्या किंमतीच्या एकरकमी ७ टक्के असेल. पेट्रोल, डिझेल, सीएनजी व एलपीजीवर
चालणाऱ्या कारसाठी उच्चतम कर मर्यादा पूर्वी २० लाख रुपये होती. ती आता वाढवून ३० लाख
रुपये करण्यात आली आहे.
ही नवीन सुधारित कररचना १ जुलै २०२५ पासून लागू झाली असून, सर्व वाहनधारकांनी
याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा