नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना आयोगाच्या नोटीसा ‘इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया’ यांना ‘कारणे दाखवा’नोटीस निवडणूक आयोगाची कार्यवाही

 

नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना आयोगाच्या नोटीसा

‘इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया’ यांना ‘कारणे दाखवा’नोटीस

निवडणूक आयोगाची कार्यवाही

अकोला, दि. 10 : गेल्या सहा वर्षांत एकाही निवडणूकीत सहभागी न झालेल्या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून नोटीसा बजावण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ‘इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया’ यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.

 

देशातील राजकीय पक्षांची नोंदणी ही लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 29अ अंतर्गत केली जाते.  त्याअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या ‘इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया’ने 2019 पासून सहा वर्षांत एकाही निवडणुकीत सहभाग घेतला नाही. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे या पक्षाची नोंदणी रद्द का करू नये, यासाठी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.

या पक्षाला त्यांच्या बाजूने आपली भूमिका मांडण्यासाठी सुनावणीची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार दि. २३ जुलै रोजी दु. ३.३० वा. मुंबई येथे मंत्रालय इमारतीतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात सुनावणीला उपस्थित राहण्याची सूचना संबंधित पक्षाचे अध्यक्ष / सरचिटणीस यांना इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, गोल बाजार, अकोट जि. अकोला या पत्त्यावर पाठविण्यात आली आहे.  

 

2019 नंतर एकाही लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुकीत भाग न घेणारे आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले पक्ष आदींच्या नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधितांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीची संधी देण्यात आली आहे. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा