अनु. जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतला विविध बाबींचा आढावा
अनु. जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी
घेतला विविध बाबींचा आढावा
अकोला, दि. १८ : अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य
धर्मपाल मेश्राम यांनी आज जिल्हा परिषदेत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
अनुसूचित जाती, जमातीसाठीच्या कल्याणकारी
योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. योजनांचे उद्दिष्ट लक्षात विभागांनी त्यानुरूप
काम करणे आवश्यक आहे, असे निर्देश श्री. मेश्राम यांनी यावेळी दिले.
आयोगाचे उपाध्यक्ष श्री. मेश्राम यांनी
प्रथम बैठकीद्वारे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण व जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडून अनुसूचित जातीच्या
संपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
त्यानंतर महिला व बालकल्याण, क्रीडा विभाग व कृषी अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेऊन
विविध कामांची सविस्तर पाहणी केली.
त्यानंतर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी
अधिकारी, जि.प. यांच्या अंतर्गत जल जीवन मिशन योजनेचा आढावा, त्याचप्रमाणे, दलित वस्ती
रमाई घरकुल वस्ती योजनेचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
अनिता मेश्राम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्यासह विविध यंत्रणांचे
अधिकारी उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा