भारतीय सेनादलातर्फे सागर येथे रिलेशन भरती

 

 

 

 

भारतीय सेनादलातर्फे सागर येथे रिलेशन भरती 

अकोला, दि. 11 : भारतीय सेनादला तर्फे युनिट हेडक्वार्टर मध्यप्रदेशातील सागर येथील महार रेजिमेंट सेंटर येथे दि. २१ जुलै ते २६ जुलै या कालावधीत युएचक्यू कोट्यातून रिलेशन आणि स्पोर्टस् भरती रॅली राबविण्यात येत आहे.

भरतीत माजी सैनिक, दिवंगत सैनिक, सेवारत सैनिक यांचा मुलगा, तसेच सेवारत सैनिकाचा भाऊ यांना सहभागी होता येईल. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर ट्रेडसमेन (८वी व १०वी) व अग्निवीर एसकेटी/ लिपिक (क्लार्क) ही पदे भरली जातील.

सहभागासाठी उमेदवाराकडे रिलेशन सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. भरतीमध्ये पायोनियर क्रॉप्ससाठी ६० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भरती प्रक्रियेतील प्रवेशासाठी तारीख मिळण्यासाठी उमेदवारांनी मो. क्र ८८७११८०३०५ किंवा ९६३०१४१२८९ या क्रमांकावर एसएमएसद्वारे नोंदणी करावी.  अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात संपर्क करावा किंवा ९६३०१४१२८९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा