बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार
बालविवाह प्रतिबंधासाठी
स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा
-
जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 23 ; जिल्हा बालविवाहमुक्त
करण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करणे आवश्यक असुन गावोगाव जागृती झाली पाहिजे. येत्या
स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगष्ट रोजी होणा-या
ग्रामसभेमध्ये गावात बालविवाह होणार नाही असा ठराव घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित
कुंभार यांनी येथे दिले.
बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाची बैठक मंगळवारी झाली, त्यावेळी
ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हा
कार्यक्रम अधिकारी राजश्री कोलखेडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा बालविवाहमुक्त करण्याकरिता कृती आराखडा तयार करण्याची सूचना
जिल्हाधिका-यांनी यावेळी केली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रतनसींग पवार, बाल कल्याण
समितीच्या सदस्य प्रांजली जयस्वाल, राजेश देशमुख, मिलिंद करंदीकर, दर्शन जनईकर ॲड.मनिषा
भोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेंद्र लाडुलकर, दीपक मसने, रमेश जोशी, बाल न्याय मंडळाच्या सदस्य अँड सारिका घिरणीकर,
तसेच पोलीस प्रतिनिधी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सर्व बालगृहांचे अधिक्षक, बालकांच्या
क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा