आपले सरकार सेवा केंद्राने जादा दर आकारल्यास तक्रार करा जिल्हा प्रशासनाचे आवाहन
आपले सरकार सेवा केंद्राने जादा दर आकारल्यास तक्रार करा
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अकोला, दि.१०: आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध
दाखले, प्रमाणपत्रे प्रदान केल्या जातात. या
सेवेचे दर नियमानुसार निश्चित आहेत. कुणीही केंद्रचालक किंवा दलाल अतिरिक्त दर आकारत
असेल तर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून
करण्यात आले आहे.
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने सर्वसामान्य
नागरिकांना व विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळतात. जातीचे प्रमाणपत्र, उत्पनाचे प्रमाणपत्र,
अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र व रहिवाशी
प्रमाणपत्र याकरिता संबंधित सेवा केंद्रावर आपला अर्ज कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने
भरणे आवश्यक आहे. त्यानंतर कागदपत्रे डिजिटल स्वरूपात तहसील कार्यालयामध्ये पाठविण्यात
येतात.
तहसील कार्यालयामध्ये तपासणी करून उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र
व सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र व रहिवाशी प्रमाणपत्र तहसील कार्यालयामधून दिले जाते. तर
जातीचे प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाकडून
निर्गमित करण्यात येतात. सदर प्रमाणपत्रावर डिजिटल स्वाक्षरी झाल्यानंतर प्रमाणपत्र
पुन्हा ऑनलाइन पद्धतीनेच आपले सरकार सेवा केंद्रावर पाठविण्यात येते. आपले सरकार सेवा
केंद्रातून नागरिकांना वितरीत करण्यात येतात,
त्यामुळे नागरिकांना नागरिकांना प्रत्यक्षात कार्यालयात येण्याची आवश्यकता
नाही. आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी सुधारित दरफलक व तक्रारीबाबतचा क्यूआर केंद्राच्या
दर्शनी भागावर प्रसिध्द करणे अनिवार्य आहे. कुणीही केंद्रचालक जादा दर आकारत असतीस त्यांच्यावर
कडक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा