सहभागासाठी शेवटचे ३ दिवस जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार
सहभागासाठी शेवटचे ३ दिवस
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी
बांधवांनी पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा
-
जिल्हाधिकारी
अजित कुंभार
अकोला, दि. २८ : प्रधानमंत्री
पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५ मध्ये जिल्ह्यातील १ लक्ष १३ हजार ५९६ अर्जदारांनी
सहभाग नोंदवला आहे. सहभागाची अंतिम मुदत ३१ जुलै असून, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी
पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे
केले.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा
आढावा घेण्यासाठी बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, इतर कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी आदी उपस्थित
होते.
उमरा महसूल मंडळातील शेतक-यांना
भरपाई द्यावी
पुनर्रचित हवामानाधारित फळपीक
विमा योजना मृग बहार सन २०२४ अंतर्गत उमरा महसूल मंडळातील फळपीक विमाधारक शेतक-यांना
तत्काळ भरपाई अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी युनिवर्सल सोम्पो
जनरल इन्शुरन्स कंपनीस दिले. याबाबत कंपनीस पूर्वीही सूचना देण्यात आली आहे. कृषी आयुक्तांनीही
याबाबत स्पष्ट केले आहे. त्यामुळे विमा कंपनीने शेतक-यांना भरपाई देण्यात टाळाटाळ करू
नये. तसे केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२४-२५
मध्ये खरीप हंगामात २ लक्ष ६४ हजार ८८५ शेतक-यांना ८०.०९ कोटी रू. अदा करण्यात आले.
रब्बी हंगामात १ हजार ४१६ शेतक-यांना २.२२ कोटी रू. रक्कम विमा कंपनीने अदा केली आहे.
काढणी पश्चात नुकसान भरपाईअंतर्गत राज्य शासन हिस्सा मिळण्यासाठी पाठपुरावा होत आहे.
पुनर्रचित हवामानाधारित फळपीक
विमा योजना मृग बहारात ४२२ शेतक-यांना १.८० कोटी रू. नुकसान भरपाई कंपनीने अदा केली
आहे. पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकरी बांधवांचा सहभाग मिळविण्याचे आवाहन यावेळी करण्यात
आले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा