राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे कृषी विभागाचा उपक्रम; अर्ज करण्याचे आवाहन
राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे
कृषी विभागाचा उपक्रम; अर्ज करण्याचे आवाहन
अकोला, दि. १६ : विविध देशांनी विकसित
केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व
त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ जाणून
शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून अभ्यास दौरे
आयोजिण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांनी दि. २३ जुलैपूर्वी तालुका
कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
शंकर किरवे यांनी केले आहे.
यंदा युरोप- नेदरलँड्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, हान्स येथे १२ दिवस
(वैशिष्ट्ये- फलोत्पादन, सेंद्रिय शेती
आणि दुग्धोत्पादन), इस्रायल
येथे ९ दिवस (वैशिष्ट्ये- आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व कृषी यांत्रिकीकरण), जपानमध्ये १० दिवस
(सेंद्रिय शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान), मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्स येथे १२ दिवस (फळे व
भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान (Post-Harvoa Technology) काणि व्यवस्थापन प्रणाली), चीनमध्ये ८ दिवस (विविध
कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढण्यासाठी लागणारे
तंत्रज्ञान आणि कृषी EXPO), दक्षिण कोरियामध्ये ८ दिवस (आधुनिक
कृषी अन प्रक्रिया तंत्रज्ञान) याप्रमाणे दौरे आयोजित करण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांची जिल्हास्तरावरून निवड करताना प्रति जिल्हा किमान १ महिला
शेतकऱ्याची व किमान १ राज्य तथा केंद्रीय शासन स्तरावरील विविध कृषी पुरस्कार
प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्याची व ३ इतर
शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
निकषांनुसार, अभ्यास
दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा. स्वत:च्या नावे चालू कालावधीचा (मागील सहा महिन्यातील ७/१२
व ८-अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व
तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद कराये (प्रपत्र-२).
शेतकऱ्याचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबामधून
फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकन्याने
स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास
येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची
झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब या व्याख्येमध्ये पती, पत्नी
व त्यांची १८ वर्षाखालील मुले/मुली).शेतकऱ्याने त्याच्या
आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या
दिवशी २५ वर्ष पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शारीरिकदृष्ट्या
तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे.
शेतकरी पारपत्रधारक
(पासपोर्ट) असावा. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाउंटंट), अभियंता, कंत्राटदार इ. नसावा.
शासनाकडून अभ्यास
दौऱ्याकरिता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम
किंवा जास्तीत जास्त रु. १.०० लाख रुपये एक लाख फक्त) यापैकी कमी असेल ती रक्कम
अनुदान म्हणून देय आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा