हिपॅटायटिस दिवसानिमित्त स्त्री रूग्णालयात कार्यक्रम
हिपॅटायटिस दिवसानिमित्त स्त्री रूग्णालयात कार्यक्रम
अकोला, दि. २९ : जिल्हा स्त्री रुग्णालयात हिपॅटायटिस दिवसानिमित्त सोमवारी
कार्यक्रम झाला.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार, वरिष्ठ तज्ज्ञ डॉ.अस्लम ,
डॉ. उमेश अग्रवाल, डॉ. वाडेकर, डॉ.अबिद उपस्थित होते.
जागतिक हिपॅटायटिस दिन २०२५ ची थीम " लेट्स ब्रेक इट डाउन" अशी
निश्चित करण्यात आली आहे, हिपॅटायटिस निर्मूलन आणि यकृताच्या कर्करोगाला प्रतिबंध
करतानाच उपचारातील आर्थिक, सामाजिक अडथळे दूर करण्यासाठी योगदान देऊया, असे आवाहन
यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मेघना बगडिया यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण एमसीएच टीम, नर्सिंग स्कूलच्या
विद्यार्थिनी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा