जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत जलसंधारण कामांचा आढावा मान्यतांच्या प्रक्रियेला विलंब नको; कामे खोळंबल्यास कारवाई करू - जिल्हाधिकारी अजित कुंभार
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत जलसंधारण कामांचा आढावा
मान्यतांच्या प्रक्रियेला विलंब नको; कामे खोळंबल्यास कारवाई करू
-
जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. २१ : ‘जलयुक्त शिवार’ मधील नियोजित कामांच्या मान्यता, निविदा ही प्रक्रिया
पावसाळा संपण्यापूर्वीच पूर्ण करून घ्यावी व पावसाळ्यानंतर तत्काळ कामांना सुरूवात
करावी. मान्यता-निविदांच्या प्रक्रियेला विलंब करून कामे खोळंबल्याचे निदर्शनास आल्यास
जबाबदारी निश्चित करू, असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिला.
जलयुक्त शिवार, जलसंधारण कामे, जलसाठ्यांची प्रगणना आदी विविध विषयांवरील
बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीत तिस-या मजल्यावरील सभागृहात झाली, त्यावेळी
ते बोलत होते. जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, सचिनकुमार वानरे, भूजल सर्वेक्षण
वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांच्यासह
विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, मान्यता, निविदा अशा प्रक्रियेत
कामे अडकून राहू नयेत. अशा प्रक्रिया व नियोजित कामे वेळेत पूर्ण व्हावीत. जिल्ह्यात
जलसंधारणाची अधिकाधिक कामे पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी यंदा करावयाच्या कामांची प्रक्रिया
सुरू करावी. तालुकास्तरीय बैठका व आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
जिओ पोर्टलवर कामे अपलोड करण्याचे कामही अनेक विभागांनी पूर्ण केले
नाहीत. जि. प., कृषी विभाग यांचीही अनेक कामे अपलोड व्हावयाची आहेत. ही प्रक्रिया शुक्रवारपर्यंत
पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी केले.
जलयुक्त शिवार योजनेत १५९ कामांच्या प्रशासकीय मान्यता झाल्या. त्यातील
११९ पूर्ण झाली आहेत. ११ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यातील उर्वरित कामे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’
या स्वयंसेवी संस्थेने पूर्ण न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. नाम फाऊंडेशननेही
कामे पूर्ण न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा