जिल्हा स्त्री रूग्णालय अकोला हिमालया बेबी फीडिंग सेंटरचे लोकार्पण
जिल्हा स्त्री रूग्णालय अकोला हिमालया बेबी फीडिंग सेंटरचे लोकार्पण
अकोला, दि. ४ : जिल्हा स्त्री रुग्णालय येथे हिमालया बेबी फीडिंग सेंटरचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार यांच्या हस्ते बुधवारी झाले.
यावेळी डॉ् विजया पवनीकर , अधिसेवक जलील शेख , अधिसेविका सुषमा कदम , समाजसेवा अधिक्षक संगीता जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णालयात अनेक माता उपचारासाठी येतात .रुग्णालय हे गर्दीचे ठिकाण असून अशा ठिकाणी स्तनपान करताना महिलांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. कधीकधी लज्जेपोटी महिला बाळाला स्तनपान करित नाही, याचा बाळाच्या मानसिक व शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होतो. अशा प्रसंगी हे बेबी फिडिंग पॉड मातांसाठी महत्वपूर्ण ठरेल. स्तनपान करण्यासाठी जास्तीत जास्त मातांनी या फीडिंग पॉडचा वापर करावा असे आवाहन करून वैद्यकीय अधीक्षक डॉ जयंत पाटील यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
हिमालया बेबी फिडिंग पॉड इन्स्टॉलेशनकरिता व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजसेवा अधिक्षक अमोल शेंडे व संगीता जाधव परिश्रम घेतले
००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा