‘एमसीईडी’ चा उपक्रम अमृत लक्षित गटातील युवकांसाठी विविध प्रशिक्षण


अकोला दि. 31 : महाराष्ट्र संशोधनउन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील बेरोजगार युवकयुवती व महिलांकरिता बेकरी उत्पादन, ब्युटी पार्लर, टॅली अकांऊटींग आदी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बेकरी उत्पादन कार्यक्रम अकोला येथे, मुर्तीजापुर येथे ब्युटी पार्लर कार्यक्रम, अकोला, मुर्तीजापुरबार्शीटाकळीबाळापुरअकोटतेल्हारापातुर येथे टॅली अकाऊंटिंग कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यासाठी निःशुल्क ३० दिवसीय तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.

अकोलापातुरमुर्तीजापुरअकोटबाळापुरतेल्हारा व बार्शीटाकळी येथे प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात तांत्रिक प्रशिक्षण हे २५ दिवसाचे असून यामध्ये प्रात्यक्षिकावर जास्त भर देण्यात येणार आहे. यासोबतच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकासशासकीय योजनेची माहितीडिजिटल मार्केटिंग अश्या अनेक प्रकारच्या विविध योजनाची माहिती तज्ञ व्यक्ती कडून मार्गदर्शन करून उद्योग उभारणी साठी सहकार्य केले जाणार आहे. यासाठी शिक्षण किमान ८ वी पासवयोमर्यादा १८ वर्षआधार कार्डखुल्या जातीचा उल्लेख असलेल्या शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रमहाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे तहसिलदाराचे प्रमाणपत्रउत्पन्नाचा दाखला व विवाहित महिला असल्यास विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहेतसेच स्वतःचा उद्योग सुरु करण्याची इच्छा असावीबँकेचा थकबाकीदार नसावाप्रशिक्षणास ३० दिवस हजर राहण्याची तयारी असावी.

सदर निशुल्क तांत्रिक प्रशिक्षणाचे कार्यक्रमात अर्ज देण्याकरिता तसेच या कार्यक्रमाची अधिक माहिती मिळण्याकरिता दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, शुक्ल सदन, दुर्गा चौक, अकोला व जिल्हा कार्यालय महाराष्ट्र संशोधनउन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरअकोला यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपले नावाची नोंदणी करावी, असे आवाहन एम. सी. ई. डी. प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी व महाराष्ट्र संशोधनउन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी जिल्हा समन्वयक धनंजय कुलकर्णी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा