आणीबाणीत कारावास भोगलेल्या दिवंगत व्यक्तींच्या जोडीदाराला मानधन

 

आणीबाणीत कारावास भोगलेल्या दिवंगत

व्यक्तींच्या जोडीदाराला मानधन

अकोला, दि. १५ : आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. २ जानेवारी २०१८ पूर्वी हयात नसल्यास त्यांच्या पश्चात हयात जोडीदार पती किंवा पत्नी यांना मानधन मिळण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

 

त्यासाठी विहित (परिशिष्ट "ब") शपथपत्र अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करणे आवश्यक आहे.  आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. 2 जानेवारी 2018 पुर्वी हयात नसल्यास त्यांच्या पश्चात हयात जोडीदार पती किंवा पत्नी अशा व्यक्तीच केवळ असे अर्ज सादर करु शकतील. दोघेही हयात नसल्यास त्यांचे कायदेशीर वारस मानधनासाठी असे अर्ज करू शकणार नाहीत, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी कळवले आहे.

 

त्याचप्रमाणे, मिसा /डी.आय. आर (आणीबाणी) खाली राजनैतिक अथवा सामाजिक कारणांसाठी अटक झालेल्या आणीबाणीधारकाबाबतचे संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक, कारागृह अधीक्षक यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. असे अर्ज 25 सप्टेंबरपूर्वी दाखल करणे करणे आवश्यक आहे. कोणत्याही स्थितीत दि.25 सप्टेंबर 2025 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा