मुष्टियोद्धा विद्यार्थिनींची प्रशिक्षणासाठी निवड
अकोल्याच्या २ मुष्टियोद्धा
विद्यार्थिनींची प्रशिक्षणासाठी निवड
अकोला, दि.17 : येथील दोन मुष्टियोद्धा महिला खेळाडूंची छत्रपती संभाजीनगर
येथे होणा-या युवक आंतरराष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
अकोल्याची राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त खेळाडू समीक्षा सोळंके हिची
४८ किलो वजन गटात आणि शालेय राष्ट्रीय स्पर्धेत
पदक प्राप्त खेळाडू रेवती उंबरकर हिची ६० किलो वजन गटात निवड झाली आहे.
भारतीय मुष्टियुद्ध परिषद व
भारतीय खेळ प्राधिकरणातर्फे हे प्रशिक्षण छ. संभाजीनगर येथे होत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
स्पर्धांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा